कार्मेल कॉनव्हेन्ट हायस्कूल नंदाखाल येथे 26 नोव्हेंबर 2025 हा दिवस देशाचा “संविधान दिवस” म्हणून साजरा केला गेला. ह्या कार्यक्रमाची सुरुवात बॅन्ड पथकाने “सारे जहा से अच्छा” या गायनाद्वारे केली. तदनंतर मानवी साखळी तयार करून ‘आम्ही भारताचे लोक’ या घोषवाक्याद्वारे ऐक्याचा संदेश दिल गेला. नंतर प्रस्तावना, प्रार्थना देशभक्तिपर गीत, संविधानाद्वारे नागरिकांना दिलेल्या आधिकाराचे वाचन,प्रतियोगिता, प्रश्नमंजुषा, चार्ट व मॉडेल्स बनवून जनजागृती करणे, सेल्फी पॉइंट तयार करणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. माननीय प्राचार्या सि. जोवियाना हयाणी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे आपल्या देशाप्रती असलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. तसेच जॉन 23 वे मराठी माध्यम आयोजित पथनाट्य सादर करण्यात आले. शेवटी बॅन्डपथकाच्याद्वारे सुमधुर राष्ट्रगीतासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.